समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी,समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

नेहमी तत्पर रहा,बेसावध आयुष्य जगू नका.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही,केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती,आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून,दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.

गरूडाइतके उडता येत नाही,म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की,ते पाप आहे असे माहीत असूनहीआपण त्याला कवटाळतो.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं,पण संकटाचा सामना करणं,त्याच्या हातात असतं.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही,ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळेअपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?

अन्याय करणे हे पाप आणिहोणारा अन्याय सहन करणे,किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊस्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

कासवाच्या गतीने का होईना,पण रोज थोडी थोडी प्रगती करा,खूप ससे येतील आडवे,बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणेम्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

थोडे दुःख सहन करुन,दुसऱ्याला सुख मिळत असेल तर,आपण थोडे दुःख सहन करायलाकाय हरकत आहे.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

प्रसिध्दी ही अशी बाब आहे,जी कितीही मिळाली तरी,माणसाची तहान भागत नाही.

मोठी स्वप्ने पाहणारेच,मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

खूप मोठा अडथळा आला की समजावंआपण विजयाच्या जवळ आलो.

स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला?कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्यालारात्री उशिरापर्यंत जगण्यास आणिसकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.चुकाल तेव्हा माफी मागा,अन कुणी चुकलं तर माफ करा.

न हरता, न थकता न थाबंताप्रयत्न करणाऱ्यांसमोरकधी कधी नशीब सुध्दा हरत.

जीवनात त्रास त्यांनाच होतोजे सतत जबाबदारी स्वीकारतात आणिजबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाहीएकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही.आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

यश प्राप्त करण्यासाठी,यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हिअपयशी होण्याच्या भीतीपेक्षाजास्त प्रबळ असली पाहिजे.

जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तरनोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आलेतर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.

मन ओळखणाऱ्यांपेक्षामन जपणारी माणस हवीत कारण,ओळख ही क्षणभरासाठी असतेतर जपवणूक आयुष्यभरासाठी.

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षादवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाहीहे जरी खरे असले तरी कोणकधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

माणसानं राजहंसासारखं असावं.आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,नाही ते सोडून द्यावं.

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळतेत्याचा तिरस्कार कधीच करू नका.कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हालाउत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

माणसाचं छोट दु:खजगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलंकी त्याला सुखाची चव येते.

नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहेकारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,तर आयुष्यभर एकटे राहाल.

मोत्याच्या हारापेक्षाघामाच्या धारांनी मनुष्यअधिक शोभून दिसतो.

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयमआणि तुमच्याजवळ सर्वकाहीअसतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,एखादी गोष्ट पूर्वीपेक्षाजास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

कावळ्याच्या मरणाचे वाईट वाटत नाही;मात्र मोर मेला तर आपण हळहळतो.कारण सौंदर्य नष्ट होते.

आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,माशाप्रमाणे, समुद्रात पोहायला शिकलोपण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्गअजून तयार व्हायचा आहे.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.एक म्हणजे वाचलेली पुस्तकंआणि दुसरी भेटलेली माणसं.

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठीआयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरीएका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.

आपल्या नियतीचे मालक बनापण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;ज्ञानाचा प्रकाश कुठुनकधी येईल सांगता येत नाही.

विचार असे मांडा कि तुमच्याविचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

आपल्याला मदत करणाऱ्यामाणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,हसा इतके कि आनंद कमी पडेल,काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,पण प्रयत्न इतके करा किपरमेश्वराला देणे भागच पडेल.